प्रतीक भास्कर शेजवळ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक गावाचा एक रहिवासी. त्यानी त्याचे सिविल इंजिनीरिंग चे शिक्षण गव्हर्नमेंट पॉलीटेकनिक कॉलेज अवसरी मधून पूर्ण केले. त्याचा पहिल्या पासूनच व्यवसाय कडे कल असल्या मुले त्याने व्यवसाय करायचा निर्णय घेतला. प्रतीक भास्कर शेजवळ यांनी बांधकाम व्यवसाय मध्ये आपले पहिले पाऊल टाकले. व्यवसायाची सुरवात झाल्या नंतर त्याना अपयशया सोबत खूप अडचणींना सामोरे जावे लागले. पहिले एक वर्ष त्याना प्रतिसाद मिळाला नाही. जेमतेम १-२ लहान मोठी कामे केली. तरीही त्यानी हार न मानली नाही व आपले प्रयत्न सुरूच ठेवले. पुढे जाऊन त्याना मिळालेल्या कामामध्ये त्यानी जिद्ध आणि चिकाटी कायम ठेवली व दिलेली दर्जेदार गुणवत्ता व प्रामाणिकपणामुळे त्याना कायम प्रतिसाद मिळू लागला. बंगलो बांधकाम क्षेत्रात आपली कार्यक्षमता सिद्ध करत ‘प्रभास ग्रुप एन्टरप्राइज’ नावाचा एक विश्वासू, खात्रीशीर, आणि गुणवत्ताधारक बँड नावारूपाला येत आहे.
सर्वात कौतुकाची बाब म्हणजे – ‘ मोठ्या भावाची साथ, प्रथमेश शेजवळ यांच्यासारखा सारथी घेऊन त्याच्या साथीने प्रतिक पुढे वाटचाल करत आहे. भाऊ सोबत असेल तर काय होऊ शकत याचा समाजात आदर्श घालून दिला आहे.प्रतिक यांनी माघील नऊ महिन्यामध्ये 17 पेक्षा अधिक प्रोजेक्ट यशस्विरित्या पूर्णत्वाकडे नेऊन ‘प्रभास ग्रुप एन्टरप्राइज’ ची आंबेगाव तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे व त्यांनी 70 पेक्षा अधिक लोकांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली आहे. ‘प्रभास ग्रुप’ मध्ये अनेक स्थानिक तसेच परप्रांतीय लोक काम करतात.प्रतिक यांच्या या प्रवासामध्ये त्यांना त्यांच्या भावासोबत मित्रांनी खूप मोलाची साथ दिली आहे शून्यातून सुरुवात करून येवढ मोठ विश्व निर्माण करणाऱ्या प्रतिक यांनी तरुणांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे
प्रभास ग्रुप एन्टरप्राइज कंपनी वार्षिक उत्पन्न 4.25 कोटी (TURNOVER 4.25 CR)